श्री स्वामी समर्थ महाराज

|| श्री गणेशाय नमः || 

|| श्री सरस्वत्यै नमः ||                           || श्री कुलदेवताय नमः ||

|| श्री स्वामी समर्थ ||

गुरु महाराज गुरु जय जय परब्रम्ह सद्‍गुरु

हम गया नहीजिंदा है

सामान्यतः संकटकाळी आपल्याला देवाची आठवण प्रकर्षाने होते. कारण "देव तरी त्याला कोण मारी" हि म्हण जशी प्रसिद्ध आहे, तशी त्याची प्रचितीहि आहे. परंतु देवांचाही उपाय जेव्हा चालत नाही; तेव्हा मात्र सद्गुरूंची आठवण होते. कारण सद्गुरुना अशक्य असे काहीही नाही असं म्हणतात. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी दत्तगुरू वेळोवेळी अवतार घेतात. दैवी अवतार दृष्ट जीवांना नष्ट करून त्यांना पुढील गती देण्यासाठी   असतो. तर गुरु अवतरात दृष्ट जीवांचे अंत:करण बदलून त्यांना भवसागर पार करविण्यासाठी असतो. सर्वच माणसांना उत्तम विचार करणे, त्यानुसार आचरण, गुरुसेवा जमतेच असे नाही. पण तरी उत्तम जीवन जगण्याची तीव्र इच्छा असते त्यांना सद्गुरूचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते.

असाच दत्तगुरूंचा एक अवतार अक्कलकोटी (सोलापूर, महाराष्ट्र) या गावी श्री स्वामी समर्थ या नावाने जगाला ठाऊक झाला.        


भिऊ नकोस ! मी तुझ्या पाठीशी आहे!

स्वामींनी दिलेल्या या वचनाची अनुभूती त्यांच्या प्रत्येक भक्ताला येत असते. "न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती"....(श्री स्वामी समर्थ तारक मंत्र). स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत, किंबहुना अभक्तासी भक्त केले याचीच प्रचिती येत असते.

स्वामी भक्तांना अनुभवांनी हेच जाणवून देत आहेत कि,
 “हम गया नही, जिंदा है
भक्तांनीं शुध्द आचरण ठेवावं, स्वकर्म रत रहावं. मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठी राहुन कायम त्यांचं रक्षण करीत आहे.
 अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ ९-२२ ॥
.....श्रीमद्‌भगवद्‌गीता:नववा अध्याय (राजविद्याराजगुह्ययोग) 

अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या/मला शरण आलेल्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून; त्यांचा योगक्षेम मी चालवितो असे श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील अभिवचन श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना दिले आहे.
 
"तसे तर आम्ही सर्वच ठिकाणी नेहमी असतो, परंतु मुख्यतः आम्ही भक्तांच्या हृदयात वास करतो", असे स्वामींनी सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी भक्त तारणार्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी जवळपास २२ वर्षे निवास केला. लोकं त्यांना अक्कलकोट स्वामी, चंचलभारती, श्री नृसिंहसरस्वती, दिगंबरबुवा, नृसिंहभान या नावानेही ऒळखतात.

       श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप अवतार आहेत. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांना दर्शन दिले. कुणाला आपल्या कुलस्वामिनीच्या रुपात, तर कुणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले, तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक योग लीला दाखविल्या. परंतु अघोरी प्रथा व अंधश्रध्दा महाराजांना पसंत नव्हती व आपल्या भक्तांकडून या गोष्टीना खतपाणी मिळूनये याची काळजी महाराज घेत.


     श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य अलौकिक होते. त्यांच्या लीला सामान्यांना बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या. स्वामींचे विविध जाती-धर्मांचे अनेक भक्त होते. परंतु महाराजांना त्यांच्या मनीचा भक्तीभाव विषेश प्रिय होता. कुणाच्या मनात काय चालले आहे हे महाराज चटकन ओळखत. कधी रागावून, कधी प्रेमाने तर कधी प्रत्यक्ष दाखले देऊन महाराज सामान्यांना भक्तीमार्गात आणत.

 या ब्लॉगचा उद्देश श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल अधिकाधिक माहीती सर्व भक्तजनात पसरवावी एवढाच आहे. जेव्हापासून स्वामींची ओढ लागली, तेव्हापासून स्वामींची विविध चित्रं, गाणी, स्त्रोत्र, कथा साठविण्याचे सत्रच सुरु झाले. मग मंत्रपठण, चरित्रामृतवाचन ओघाने आलेच. परंतु काहीवेळेस हि सर्व माहिती जमवताना फारच वेळ लागायचा. तेव्हा मनाची अवस्था फारच विचित्र व्हायची. मन अधीर असतानाही, काहीवेळेस हवे असलेले हाती लागायचे नाही. तेव्हाच मनात कुठेतरी पक्के होत होते कि, आपल्या जवळ उपलब्ध माहिती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवायची आणि त्यातुनच ब्लॉग प्रपंचाची सुरुवात झाली. या ब्लॉग वरील माहिती संपुर्णपणे मी लिहिलेली नाही. विविध संकेतस्थळांवरुन गोळा करून ती येथे मांडली आहे. शक्य तेथे त्यांच्या संकेतस्थळांची नोंद आहे. अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतॊ. तरी मित्रांनॊ जर तुमच्यापाशी स्वामींबद्दल काही माहीती, कथा, चित्रे वगैरे असल्यास या ब्लॉग वर प्रकाशित करुन, हा ब्लॉग तुम्ही समृद्ध करू शकता. तुमचे सहर्ष स्वागत आहे. 
  || श्री स्वामी समर्थ ||

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज,
परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु, अक्कलकोटनिवासी,
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''
 
My object behind this blog is to collect all sort of information including pictures, stotras, stories, websites, links, articles written on Shree Swami Samarth Maharaj under one roof for the convenience of devotees. BlogStartDate:30-June-2011.

2 comments:

  1. he swamisamrtha 'har roj nity tuze honare darshan ;tuza sahwas 'hech maze nity dinchryet ;puja sandhya hawan jewan houn baslele ahet.aata tuzya shiway sagal vyartha re...tuzach..akinchan_swamishishuvidehanandtiwarimaharaj.karanja datt.

    ReplyDelete
  2. ।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।

    ReplyDelete

कृपया आपला अभिप्राय खाली लिहा.