स्तोत्र व मंत्र, ग्रंथ

http://smashits.com/index.cfm?Page=Search&SubPage=Audio&SRC=1&FindFactor=swami+samartha+kathamrit&SearchID=album&SearchExact=0
स्तोत्र व मंत्र 
ज्याचे वंशी कुलधर्म स्वामी सेवा, त्याचे वंशी जन्म देरे देवा ।
ज्याची वाणी रंगीली स्वामी नामी, तया संगे सुसंवाद घडॊ स्वामी ॥
स्तोत्र: इच्छित फलप्राप्तीसाठी  देवी-देवतांच्या स्तुतीपर रचना म्हणजेच स्तोत्र. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत.
मंत्र: 'मननात् त्रायते इति मंत्रः'असे संस्कृत वचन आहे. ज्याचे मनन केले असता जो (तुम्हाला) (भवसागरातुन) तरुन नेतो तो मंत्र अशी मंत्राची व्याख्या आहे. 
 सहस्त्रनामस्तोत्र
हिंदू देवदेवतांची सहस्त्र नावे, स्तोत्र रूपात गुंफलेली आहेत.
 स्तोत्र व मंत्र लयीत/विशिष्ट चाल लाउन हृदयापासून म्हंटल्याने त्यांचा अधिक परिणाम साधता येतो असे म्हणतात. स्वामी स्मर्तुगामी म्हणजे स्मरण करताच भक्तांजवळ प्रकटणारे आहेत. तेव्हा प्रेमाने स्मरण केले वा हाक जरी मारली तरी ती स्वामींना पुरेशी असते.
 स्वामींचे काही मंत्र व  गजर:
.|| श्री स्वामी समर्थ ||
.|| ॐ श्री स्वामी समर्थ ||
३.|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
४.|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
५.|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, अक्कलकोट निवासी माझे स्वामी भगवंत ||
६.|| दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट दया हो ||
७.|| कपाळी केशरी गंध, स्वामी तुझा मला छंद ||
~:०  "श्री स्वामी कृपातीर्थ समर्थ तारक मंत्र" ०:~
नि:शंक हो निर्भय हो मना रे ||
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ||
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी ||
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय ||
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||
आज्ञेविन काळ ना नेई त्याला ||
परलोकीही ना भिती तयाला ||
उगाची भितोसी भय हे पळु दे ||
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे ||
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा ||
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा ||
खरा होई जागा श्रद्धेसहीत ||
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त ||
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ||
नको डगमगु स्वामी देतील साथ ||
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ ||
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात ||
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती ||
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ||
|| श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||

~:० || श्री स्वामी समर्थाष्टक || ०:~
असें पातकी दीन मीं स्वामी राया |
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
 नसे अन्य त्राता जगी या दीनाला |
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ||

मला माय न बाप न आप्त बंधू |
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||
तुझा मात्र आधार या लेकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ||

नसे शास्त्र विद्या कलादीक काही |
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||
तुझे लेकरु ही अहंता मनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ||

प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा |
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||
क्षमेची असे याचना त्वत्पदाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ||

मला काम क्रोधाधिकी जागविले |
म्हणोनी समर्था तुला जागविले ||
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ||

नको अंत पाहू त्वरे धाव घेई |
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||
अनाथासि आधार तुझा दयाळा |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ||

कधी गोड वाणी न येई मुखाला |
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ||

मला एवढी घाल भिक्षा समर्था |
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ||

|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||

~:० ॥ श्री स्वामी समर्थ मालामंत्र ॥ ०:~
॥ श्रीगणेशाय नम: ॥
जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे ।
कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥
ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामी समर्था ।
स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजनवंदिता ॥
चिदानंदात्मकात्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका ।
बालोन्मत्ता पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥
चित् चैतन्या चिरंतना | अवधूता निरंजना |
जगदाधारा सुदर्शना | सुखधामा सनातना ||
सकलकामप्रदायका | सकलदुरितदाहका |
सकल संचित कर्महरा | सकल संकट विदारा ||
ॐ भवबंधमोचना | ॐ श्री परम ऐश्वर्यघना |
ॐ स्वां स्वहितधर्मचालका | ॐ मां नित्यदायका ||
ॐ संसारचक्र छेदका | ॐ मां महाज्ञानप्रदायका |
ओमर्थं महावैराग्य-साधका | ॐ नं नरजन्मसार्थका ||
ॐ मां महाभयनिवारका | ॐ भक्तजनहृदयनिवासा |
परकृत्या थोपव थोपव | परमंत्रा शांतव शांतव ||
परयंत्रा विखर विखर | ग्रहभूतादिपिशाच्च पीडा हर हर |
दारिद्र्यदु:खा घालव घालव | सुखशांती फुलव फुलव ||
आपदा विपदा मालव मालव | गृहदोष वास्तुदोष |
पितृदोष सर्पदोषादि | सर्वदोषा विरव विरव ||
अहंकारा नासव नासव | मन चित्तबुद्धी स्थिरव स्थिरव |
नमोजी नमो देव महादेव | देवाधिदेव श्री अक्कलकोट
स्वामी समर्थ गुरुदेव ||
नमो नमो नमो नमः || ( सप्तशते सिद्धि: ) ||
॥ हरि ॐ ॥

~:० श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ  ०:~
ओळख तो आवाज
ओळख ती खुण

आपल्या भक्तांसाठी
तो फिरतो आहे अजुन

त्याला उगम नव्हता
त्याला अंत नाही

तो त्रैल्योक्याचा स्वामी
नुसताच संत नाही

त्याचे स्मरण कर
देहभान विसरुन

तो हळूवार येईल अन
जाईल कानात सांगुन

"
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे "  


~:० सद्ग़ुरुरायाची प्रदक्षिणा ०:~
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्ग़ुरुरायाची/
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची// ध्रु. //

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी/
सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी/ धन्य.//१//

मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती/
नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती/ धन्य. //२//

कोटि ब्रम्हहत्या हरती करितां दंडवत्/
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात/ धन्य. //३//

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि/
अनुभव जे जाणती ते गुरुपदिचे अभिलाषी/ धन्य. //४//

प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला/
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला/ धन्य. //५//
 ~०: "माऊली" ०:~
विशाल कुलकर्णी
चरण सदगुरुंचे, पंचप्राण माझे
सर्वतीर्थे दावी , सदगुरुराय माझा !!
गुरु सुखांचे आगर, गुरु भाग्य दाता
ज्ञानियांचा राजा, गुरुराज माझा !!
सेविता दु:खिता, ठेवा ऐहिकाचा
सदैव पाठीशी तो, स्वामीनाथ माझा !!
चैतन्याचा स्त्रोत, ते अद्वैत स्वरुप
मुर्तीमंत कैवल्य, प्रभुराय माझा !!
आता पश्चाताप, सारी उतरली भूल
आशिर्वादे ठेवील, वटवृक्ष माझा !!
तोचि सगुण, तोची निर्गुण, स्वयं परब्रम्ह
स्वामी समर्थ माझे,अक्कलकोटी राणा !!
श्री स्वामी समर्थ !


 ~०) आरती (०~
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था
जय जय गुरु अवतारा पदी ठेवी माथा ध्रु

न्रुसिंह सरस्वती अवतार संपविले
कर्दळी वनात जाऊनी तपाचरण केले
नवरुपा धारण करुनी प्रगट पुन्हा झाले
नाना नामे घेऊनी देशभ्रमण केले १

योगसिध्दी प्रभावे लिला तू करीसी
धर्म संरक्षुनी जनासी उध्दरसी
वाटे ब्रम्ह प्रकटले या भूमीवरती
दर्शन होता मिळते चिरसुख मनःशांती २

आर्त भावीक साधक तुजसी शरण येता
मार्गदर्शन करुनी होसी त्या त्राता
सर्वा भूती ईश्वर बघण्या शिकवीला
अनन्यभक्ता रक्षिसी आश्वासन देता ३

परब्रम्ह गुरुदेवा क्रुपा करी आता
शरण तुजसी आलो तारी अनाथा
भुक्ती-मुक्ती सद्गती देई भगवंता
गुरुराया अवधूता अवतारी दत्ता ४  



स्वामी सूत महाराज
माझी माता तुमचे घरी, म्हणुनी मी हो आलो द्वारी।
आम्हां नको तुमचे काही, स्वामी चरण दावा बाई ॥
स्वामी चरणांचे रज, देऊनी तृप्त करा मज।
माझी माय आहे आत, मज दाखवा त्वरित॥
माय सोडुनिया बाळ, कैसा घालविला काळ।
आम्ही जाऊनिया आत, तुमचे काही नाही नेत॥
प्रेमपान्हा देऊनी सोडा, गाता येऊ हो पोवाडा।
स्वामी सुत म्हणे आई, बाळा भेटवावे बाई॥

अक्कलकोटला स्वामी असताना काही दिवस अक्कलकोटच्या वाड्यात देखील राहायचे. अशा वेळी वाड्यातली मंडळी सामान्य नागरिकांना स्वामींचे दर्शन घेऊ देत नसत, अशाच एका प्रसंगी स्वामी सूतांना दर्शनासाठी वाड्यात यायला मज्जाव केला त्यावेळी स्वामी सूतांनी ह्याच पंक्ती म्हटल्या असतील..
 
http://groups.yahoo.com/group/GajananShegaonBhaktPariwar/message/3703